Ad will apear here
Next
सव्वाचार लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवले; नौदलाचे पथकही कोल्हापूरकडे रवाना


मुंबई :
कोल्हापूर, सांगलीत निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा पुरातून आतापर्यंत चार लाख २४ हजार ३३३ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापुरातील दोन लाख ३३ हजार १५०, तर सांगलीतील एक लाख ४४ हजार ९८७ नागरिकांचा समावेश आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ), लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दल आदींचे जवान बचावकार्य करत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमचे नौदलाचे १५ जणांचे पथकही बोटींसह शिरोळकडे (जि. कोल्हापूर) रवाना झाले असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.



कोल्हापूर जिल्ह्यात ७४ बोटींद्वारे, तर सांगली जिल्ह्यात ९३ बोटींद्वारे मदतकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची २३, तसेच नौदलाची २६, तटरक्षक दलाची सांगलीमध्ये दोन व कोल्हापुरात नऊ, सैन्यदलाची आठ, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची सांगलीत दोन तर कोल्हापुरात एक अशी पथके कार्यरत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमचे १५ जणांचे नौदलाचे पथक बोटींसह शिरोळकडे रवाना झाले आहे.
नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात १८७, तर सांगली जिल्ह्यात ११७ केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४३ हजार ९२२ जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.



बाधित गावे व कुटुंबे
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित गावे २४९ असून, बाधित कुटुंबांची संख्या ४८ हजार ५८८ आहे. सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे १०८ असून, बाधित कुटुंबांची संख्या २८ हजार ५३७ एवढी आहे. 

पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा वेळोवेळी घेण्यात येत आहे. 

मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाइनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशांना तत्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.

नौदलाचे पथक रवाना

‘पंचगंगेची पातळी घटली’
‘पंचगंगा नदीची पातळी सुमारे साडेतीन फुटांहून अधिक घटली असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ‘शिरोळमधील गावांसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, तटरक्षक दलाच्या एकूण ४५ बोटी आणि पथकांसह मदत पोहचवून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

अलमट्टीतून पाच लाख क्युसेक विसर्ग सुरू
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे खुले आहेत. त्यामधून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता कोयना धरणामधून ७७ हजार ९८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.



राज्यातील इतर बाधित गावे
कोल्हापूर शहरासह एकूण ६९ तालुके आणि ७६१ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.
सातारा : ११८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती  : ९२२१), ठाणे : २५ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : १३१०४), पुणे : १०८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : १३,५००), नाशिक : ५ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ३८९४), पालघर : ५८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : २०००), रत्नागिरी : १२ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ६८७), रायगड : ६० गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ३०००), सिंधुदुर्ग : १८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ४९०) 



नवजात अर्भके आणि गर्भवती स्त्रियांची सुटका
‘एनडीआरएफ’च्या जवानांनी १० ऑगस्ट रोजी करनूर, कागल (जि. कोल्हापूर) येथील काही गर्भवती स्त्रिया, तसेच नवजात अर्भकांना सुरक्षितपणे एम. जी. हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. विनंती गणेश धुंके (२२), सुनंदा अंबाजी कांबळे (२०), अना फिरोझ पठाण (२२) या गर्भवती स्त्रियांचा त्यात समावेश होता. शीतल सुनील या वीस वर्षांच्या महिलेने १० ऑगस्टला सकाळी घरीच बालकाला जन्म दिला. तिलाही बाळासह हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आल्याची माहिती ‘एनडीआरएफ’कडून देण्यात आली. 

(‘एनडीआरएफ’च्या जवानांकडून सुरू असलेल्या बचावकार्याचे व्हिडिओ शेवटी दिले आहोत.)

खालील शीर्षकांवर क्लिक करून, अधिक माहिती घेऊन तुम्हीही पूरग्रस्तांना मदत पोहोचवू शकता.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZWCCD
Similar Posts
तुम्हालाही पूरग्रस्तांना मदत करायचीय? असे आहेत पर्याय... पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणांसह राज्याच्या विविध भागांतील खासगी संस्था, संघटनांनीही युद्धपातळीवर कार्य सुरू केले आहे. त्यात राज्यातील नागरिकांनाही सहभागी होता येईल. त्यापैकी काही पर्यायांची माहिती येथे देत आहोत.
अनोखे रक्षाबंधन; रक्षणकर्त्या एनडीआरएफ जवानांना बांधल्या राख्या! सांगली : सांगली आणि कोल्हापूर येथील महापुरात अडकलेल्या असंख्य नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान रात्रंदिवस कार्यरत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगली, मिरज, कोल्हापूर येथील अनेक महिलांनी जवानांना राख्या बांधल्या
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता पुणे : पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, पूरग्रस्तांना शासनासह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवली जात आहे. या भागातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या दोन लाख २० हजार किट्सची गरज होती. त्यापैकी एक लाख पाच हजार किट्स उपलब्ध झाली आहेत
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language